Car Under 6 Lakh: कार खरेदी करण्याचा अनेकांचा विचार असतो. मात्र, अनेकजण जास्त किंमतीमुळे गाडी खरेदी करण्याचे टाळतात. तुम्ही देखील जास्त किंमतीमुळे कार खरेदी करत नसाल तर काळजी करू नका. बाजारात 5 ते 7 लाख रुपयांच्या बजेटमध्ये अनेक चांगले पर्याय आहेत.
Maruti Suzuki Celerio
Maruti Suzuki Celerio ची किंमत 5.36 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. यामध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 67bhp पॉवर आणि 89Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही कमी किंमतीत येणारी कार तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
Renault Kwid
Renault Kwid मध्ये1.8 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 68bhp पॉवर आणि 91Nm पीक टॉर्क जनरेट करा. या कारची 4.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवाती किंमत आहे.
Tata Tiago
तुमच्यासाठी टाटा टियागो देखील चांगला पर्याय ठरू शकता. 4.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) सुरुवाती किंमतीत येणाऱ्या या कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले असून, हे 86bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये सीएनजी पावरट्रेनचा पर्याय देखील आहे.
Maruti Suzuki Alto K10
मारुती सुझुकी ऑल्टो K10 ची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे. यामध्ये 1.0-लीटर K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे 67bhp पॉवर आणि 89Nm पीक टॉर्क जनरेट करते.
Maruti Suzuki S-Presso
मारुती सुझुकीचे हे मॉडेल देखील खूपच कमी किंमतीत उपलब्ध आहे. या कारमध्ये ऑल्टो K10 प्रमाणेच 1.0-लीटर K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या कारची किंमत 4.26 लाख रुपयांपासून सुरू होते.