नवी दिल्ली – देशात २०२३ -२४ या आर्थिक वर्षात दूधाच्या उत्पन्नात २०२२-२३ च्या तुलनेत ४ टक्के वाढ झाली आहे. केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने कालच्या दूध दिनानिमित्ताने ही आकडेवारी जारी केली आहे. यासह मांसाच्या उत्पन्नात ४ टक्क्यांनी तर अंड्यांच्या उत्पन्नात ३ टक्क्यांनी वाढ झाल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशात १४३ अब्ज अंड्यांचे उत्पादन झाले असून मांसाचे उत्पादन ३४ कोटी किलोग्राम झाले आहे. दूधाचे उत्पादनही २३९ कोटी टन झाल्याचे या आकडेवारीत मांडण्यात आले आहे. दूधाच्या उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर असून त्या खालोखाल राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रात दूधाचे उत्पादन होते. म्हशीच्या दूधाचे प्रमाण सर्वाधिक ३१.५ टक्के असून बकरीच्या दूधाचे प्रमाण सर्वात कमी ३ टक्के आहे. पशूपालन व दूग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी ही आकडेवारी प्रकाशित केली आहे. दूधाचे उत्पादन अधिक वाढवण्यासाठी डेअरी मालकांनी अत्याधुनिक साधनांचा व कृत्रिम रेतन प्रक्रियेचा अधिकाधिक वापर करावा असे आवाहनही सिंह यांनी केले.