दिव्यांगांना एसटीच्या बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षित आसन

मुंबई – दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन केवळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्याची सूचना एस. टी. महामंडळाने स्थानिक एसटी प्रशासनाला दिलेल्या आहेत. बसमध्ये दिव्यांग प्रवासी प्रवास करीत नसतील तेव्हा ते आसन सामान्य प्रवाशांसाठी उपलब्ध होईल. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यावर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असेल. याबरोबरच दिव्यांगांना प्रवास करताना कोणती अडचण येऊ नये, म्हणून त्यांना चढ-उतार करताना प्राधान्य दयावे. तसेच त्यांचा थांबा आल्यानंतर त्यांना त्याची माहिती देऊन बसमधून उतरण्यासाठी चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देश देखील एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top