नवी दिल्ली- महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. परंतू, आम आदमी पक्षाने आयारामांना पक्षात प्रवेश देत पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आपने ११ जणांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात काँग्रेस आणि भाजपातून आलेल्या सहा जणांना तिकीट दिले आहे. तर उर्वरित आपचेच विद्यमान आमदार आहेत. दरम्यान, आपने पहिली यादी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
भाजपामधून आपमध्ये आलेल्यांमध्ये ब्रह्मसिंह तंवर (छतरपूर), अनिल झा (किरारी), बीबी त्यागी (लक्ष्मी नगर) यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसमधून आपमध्ये आलेल्या झुबेर चौधरी (सीलमपूर), वीरसिंह धिंगण (सीमापुरी), सोमेश शौकीन (मटियाला) यांना संधी दिली आहे. अपच्या विद्यमान आमदारांमध्ये दीपक सिंगला (विश्वास नगर), सरिता सिंह (रोहतास नगर), रामसिंह नेताजी (बदरपूर), गौरव शर्मा (घोंडा), मनोज त्यागी (करवल नगर) यांना उमेदवारी दिली आहे.