नवी दिल्ली- दिल्लीत प्रदूषण इतके वाढले आहे की, मला दिल्लीत यावेसेच वाटत नाही असे मनोगत केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी जिवाश्म इंधनाचा वापर कमी केला पाहिजे. आज देशात २२ लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात केली जाते. त्यामुळे इतर आपांरपरिक इंधनांना प्रोत्साहन देऊन जिवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न गरीबी, भुकबळी व बेरोजगारी आहे. यासाठी सरकारला आर्थिक व सामाजिक समता स्थापित करावी लागेल. त्या
दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. दिल्लीचे प्रदूषण कमी केल्यास येथील आरोग्य चांगले होईल. मी जेव्हा जेव्हा दिल्लीत राहतो तेव्हा मला हवेच्या संक्रमणाचा त्रास जाणवतो.