दिल्लीत मुसळधार पावसाने २७ वर्षांतील विक्रम मोडला

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत काल झालेल्या मुसळधार पावसाने मागील सत्तावीस वर्षांचा विक्रम मोडीत काढला. दिल्लीत काल संध्याकाळपर्यंत ३१.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. १९९७ सालापासून डिसेंबर महिन्यात दिल्लीत एवढी अतिवृष्टी कधी झाली नव्हती.१९९७ मध्ये दिल्लीत डिसेंबर महिन्यात विक्रमी ७१.८ मिलीमीटर पाऊस झाला होता. तो विक्रम काही कालच्या पावसाने मोडला नाही. मात्र तेव्हापासून दिल्ली डिसेंबर महिन्यात दिल्लीत एवढा पाऊस पडला नव्हता. कालच्या ३१.५ मिलीमीटर पाऊस हा १९९७ नंतरच्या सत्तावीस वर्षांतील विक्रमी ठरला. तसेच दिल्लीत डिसेंबरमध्ये एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस पडण्याचा विक्रमी १०१ वर्षातील आजच्या पावसाने मोडला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top