नवी दिल्ली – दिल्लीतील प्रशांत विहार परिसरात आज सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बन्सी स्वीट्स या दुकानाजवळ झाला. या स्फोटात एक जण किरकोळ जखमी झालाहा स्फोट नेमका कसला होता, हे अद्याप समजू शकलेले नाही.
स्थानिकांनी स्फोटाची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे दल घटनास्थळी आले. त्याचवेळी अग्निशमन विभागालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. या परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसांना सफेद पावडर मिळाली असून तिची तपासणी सुरू आहे.
गेल्या महिन्यात, रोहिणीच्या प्रशांत विहारमधील सीआरपीएफ शाळेच्या भिंतीवर जोरदार स्फोट झाला होता, ज्यामुळे सगळीकडे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेत कुणीही जखमी झाले नव्हते. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला असतानाच स्फोटाची दुसरी घटना घडली आहे.