दार्जिलिंगच्या प्राणिसंग्रहालयात लवकरच रेड पांडाचे आगमन

दार्जिलिंग – दार्जिलिंगच्या पद्मजा नायडू हिमालयन झुलॉजिकल पार्कमध्ये लवकरच रेड पांडा जातीचे दोन नर अस्वल दाखल होणार आहेत.नेदरलँडसच्या रॉटरडॅम प्राणिसंग्रहालयातून हे रेड पांडा आणले जात आहेत. सुमारे चाळीस तासांचा प्रवास करून हे पांडा उद्या दार्जिलिंगच्या उद्यानात पोहोचणे अपेक्षित आहे.नेदरलँडसमधून दोहा मार्गे २७ तासांचा विमान प्रवास करून पांडा प्रथम कोलकाता येथे पोहोचतील. तेथून रस्ते मार्गे चौदा तासांचा प्रवास करून ते दार्जिलिंगच्या उद्यानात पोहोचतील.या पांडांना सुरुवातीला एक महिन्याभर विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांना मोकळ्या जंगलात सोडण्यात येईल,अशी माहिती उद्यानाचे संचालक बसवराज होलेयाची यांनी दिली.