दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जून पैशाच्या अफरातफरीचा आरोप

हैदराबाद – दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन यांच्याविरूद्ध पैशांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादच्या एन कन्व्हेन्शन सेंटरशी संबंधित हे प्रकरण आहे.याबाबत माहिती देताना माधापूर विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्ण मोहन यांनी सांगितले की, एन कन्व्हेन्शन सेंटरच्या वतीने भास्कर रेड्डी यांनी नागार्जून यांच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. अद्याप नागार्जुन याला अटक करण्यात आलेली नाही.दरम्यान, नागार्जुन याने आपल्यावरील आरोप साफ फेटाळले आहेत. त्यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले की, चटपटीतपणासाठी सेलिब्रिटींशी संबंधित बातम्या विपर्यास करून पसरविल्या जातात. एन कन्व्हेशन सेंटरच्या बांधकामात एका पैशाचाही भ्रष्टाचार झालेला नाही.