दहिसरमध्ये मनसेची मतमोजणीतून माघार

मुंबई- विधानसभा निवडणुकीची निकाल जाहीर होत असताना, दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू येरुणकर यांनी मतमोजणीतून माघार घेतली. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी मतमोजणीच्या ११ फेऱ्यांनंतर माघार घेतली. याबाबत राजू येरूणकर म्हणाले, स्ट्राँग रुम उघडल्यानंतर एका ईव्हीएम मशीनचे सील तुटलेले होते. याबाबत विचारणा केली असता, मशीन हाताळत असताना ईव्हीएमचे सील तुटल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. पण इतर मशीनला सील असताना एका मशीनचे सील तुटणे ही संशयास्पद बाब आहे. त्यामुळे मतमोजणीतून आम्ही माघार घेतली. आम्हाला निवडणूक अधिकार्यांनी पोलिसांकडे नेण्याची , तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत. मनसे कार्यकर्त्यांची मतेही आम्हाला मिळाली नाहीत. आम्हाला केवळ पाच मते मिळाली. त्यामुळे ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा संशय आहे. सगळ्या ईव्हीएम मशीन्सला तीन-तीन सील असतील, तर एका मशीनला एक सील कसे असू शकते?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top