दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

वॉशिंग्टन – २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधातील अपील अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे राणाला आता भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन व्यावसायिक आहे. गेल्या वर्षी अमेरिकेतील नवव्या सर्किट कोर्टात त्याने अपील दाखल केले होते.सुनावणी पूर्ण होईपर्यंत आपल्याला भारताच्या ताब्यात देऊ नये,अशी विनंती त्याने या अपिलाद्वारे केली होती. मात्र न्यायालयाने त्याचे अपील फेटाळले. ज्या आरोपांच्या आधारावर भारताने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे, ते पाहता त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते,असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, तहव्वूर राणा हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आहे असून हेडली लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी काम करतो याची कल्पना तहव्वूरला होती.हेडलीला मदत करून तहव्वूर राणा दहशतवादी कृत्याला खतपाणी घातले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top