पुणे : गाणपत्य संप्रदायाच्या वतीने कार्तिक शुद्ध चतुर्थीनिमित्त श्री उमांगमलज जन्मोत्सवात आज तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य दाखवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा करण्यात आली.यानिमित्त दगडूशेठ मंदिरात नारळांची आरास करण्यात आली. पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सूक्तपठण झाले.
