त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याच्या यात्रेला सुरुवात

नाशिक :

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीला आज पहाट पासून प्रारंभ झाला. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी संत निविदास महाराज समाधी मंदिरात महापूजा केली. यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांनी वारीला प्रारंभ झाला. या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी त्र्यंबक नगरपरिषदेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यंदा पौषवारीसाठी राज्यभरातून ६०० हून अधिक दिंड्या त्रंबकेश्वरी दाखल झाले असून दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ लागली होती. दर्शन बारी आणि मुख दर्शन रात्रभर सुरू आहे. आज दिवसभर संतांच्या नाम स्मरणाने तसेच टाळ, मृदुंगाच्या तालाने त्र्यंबकेश्वर नगरी दुमदुमली होती. वारकऱ्यांसाठी त्रंबकेश्वर नगरपालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाण्याच्या टँकर, शौचालय यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने दीडशे, तर नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक या बस सेवेच्या माध्यमातून सतरा जादा बस सोडण्यात आल्या आहेत. याशिवाय लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे पतसंस्थेच्या फिरत्या दवाखान्याद्वारे संत निवृत्तीनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या दिंड्यांतील वारकऱ्यांवर मोफत उपचार सुरू आहेत. दरम्यान, यात्रेसाठी होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top