तुळजापूर ड्रग्ज तस्करीत१३ पुजाऱ्यांचा सहभाग

धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात १३ पुजाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती आहे. आतापर्यंत ३५ आरोपी आढळले असून २१ आरोपी फरार आहेत. याप्रकरणी थेट पुजाऱ्यांचा संबंध आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे.
पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यांनी याबाबत सांगितले की, ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नाही. तुळजापूर हे पुजाऱ्यांचे गाव आहे. येथे अनेक पुजारी आहेत. सरसकट पुजाऱ्यांना बदनाम करू नका. ३ वर्षांपासून तुळजापूरात सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात पुजारी मंडळानेच पहिल्यांदा आवाज उठवला होता.