भुवनेश्वर – तिरुपती बालाजीच्या लाडवांच्या प्रसादात चरबीयुक्त तुपाचा वापर होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आता पुरीच्या जगन्नाथ मंदिरात देण्यात येणाऱ्या महाप्रसादातील तुपाचे परीक्षण केले जाणार आहे. महाप्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे हे तूप परीक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे. ओडिशातील वकील दिलीप बराल यांनी या परीक्षणाची मागणी केली होती.या बाबतीत पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वाईन, जे जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे प्रमुख उपप्रशासकही आहेत. त्यांनी सांगितले की, मंदिरात तयार करण्यात येणाऱ्या महाप्रसादात कोणत्याही प्रकारची भेसळ होत असल्यास ती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात या बाबतीत आतापर्यंत कोणीही तक्रार केलेली नाही.
