तामिळनाडूच्या समुद्रात तस्करांनी फेकलेले सोने जप्त

चेन्नई- भारतीय तटरक्षक दल आणि रामनाथपुरम येथील सीमाशुल्क विभाग प्रतिबंधक युनिट यांच्या संयुक्त कारवाईत एका तस्कर टोळीने तामिळनाडूमधील मंडपम समुद्रात फेकलेले ४.९ किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले.

रामनाथपुरम जिल्ह्यातील मंडपम समुद्राच्या वेधलाई किनाऱ्यावरून श्रीलंकेतून विदेशी सोन्याची भारतात तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.त्यानुसार डीआरआय आणि भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी संशयित मासेमारी बोटीच्या हालचालींवर पाळत ठेवली होती.मध्य समुद्रात ही बोट दिसताच तटरक्षक दलाच्या जहाजाने पाठलाग सुरू केला. मात्र ही बोट अडवण्याच्या आधीच बोटीवरील एका व्यक्तीने काही माल समुद्रात टाकला.शेवटी बोट अडवून त्या भागात शोध घेतला असता खोल समुद्रात ३.४३कोटी रुपये किमतीच्या ४.९ किलो वजनाच्या वेगवेगळ्या आकाराच्या कच्च्या सोन्याच्या लगडी एका टॉवेलमध्ये बांधलेल्या आढळल्या. हे सोने त्यांना श्रीलंकेच्या एका बोटीवरून मिळाले होते.याप्रकरणी सोने आणि बोटीसह तीनजणांना अटक करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top