ताजमहालला बॉम्बने उडवण्याची धमकी

दिल्ली: जगातील सात आश्चर्यापैकी एक ओळख असलेल्या आग्र्यातील जगप्रसिद्ध ताजमहालला आजा बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली. उत्तरप्रदेश पर्यटन विभागाला आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ईमेलद्वारे ही धमकी मिळाली. या मेलमध्ये ताजमहालमध्ये बॉम्ब लावण्यात आला असून सकाळी ९ वाजता बॉम्बस्फोट होईल, असे सांगितले होते. पर्यटन विभागाने लगेच प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली . हा धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर ताज येथील पोलीस आणि सीआयएसएफ कडून ताजमहालची सुरक्षा वाढवली. ताजमहालाची कसून तपासणी केली. परंतु काहीही संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. सध्या ताजमहालाची सुरक्षा वाढवण्याता आली असून ईमेल कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top