तांत्रिक बिघाडामुळे दोन गाड्या एकाच रुळावर

जयपूर

जैसलमेर जिल्ह्यातील पोखरणपासून ३ किमी अंतरावर असलेल्या गोमट गावाजवळील डायव्हर्जन पॉईंटवर काल दोन रेल्वेगाड्या एकाच रुळावर समोरासमोर आल्या. गाड्यांमधील तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

जैसलमेर के पोखरणपासून ३ ते ४ किमीच्या अंतरावर गोमट रेलवे स्टेशन आहे. येथे एक ट्रने गेल्यानंतर दुसऱ्या ट्रेनला रवाना केले जाते. येथे काल जैसलमेरहून येणारी लालगढ एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे डायव्हर्जन पॉईंटवरून पुढे गेली. यावेळी जैलसमेरला जाणारी साबरमती एक्स्प्रेस पोखरणवरून येत होती. या दोन्ही गाड्या एकाच रेल्वेरुळावर समोरासमोर आल्या. सुदैवाने दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या नाहीत. दोन्ही ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. दोन्ही गाड्या तासभर रुळावर उभ्या होत्या. त्यानंतर लालगढ एक्स्प्रेस मागे घेण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top