UPSC IES, ISS 2025: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) काही दिवसांपूर्वीच नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जारी केली. या अंतर्गत 979 पदांची भरती केली जाणार आहे. आता आयोगाने भारतीय आर्थिक सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षा 2025 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 47 रिक्त पदे भरली जाणार आहेत, ज्यामध्ये भारतीय आर्थिक सेवेच्या 12 आणि भारतीय सांख्यिकी सेवेच्या 35 पदांचा समावेश आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in वर जाऊन 4 मार्च 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी upsc.gov.in वेबसाइटवर जावे लागेल.
- त्यानंतर होमपेजवर IES/ISS 2025 अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहिती जसे की नाव, जन्मातारीख, शिक्षण इत्यादी माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
- तुम्ही भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करू शकता.
दरम्यान, आयोगाकडून भारतीय आर्थिक सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षेचे आयोजन जून महिन्यात करण्यात येणार आहे. ही परीक्षा 20 जून 2025 पासून सुरू होईल. परीक्षेच्या काही दिवस आधी अधिकृत वेबसाइटवर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. या परीक्षेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.