न्यूयॉर्क- डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून सातत्याने अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांनी सरकारी खर्चात कपात करण्यासाठी अनेक विभाग बंद करण्यापासून ते कर्मचाऱ्यांच्या कपातीचे निर्णय घेतले आहेत. आता ट्रम्प प्रशासनाची नजर आपल्या सैन्यांकडे वळली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे लवकरच तब्बल ९० हजार सैनिकांना कामावरून काढणार आहेत.
ट्रम्प यांनी सरकारी खर्च कमी करण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशिएन्सीची स्थापना केली आहे. या विभागाचे प्रमुख अब्जाधीश इलॉन मस्क आहेत. या विभागाने परदेश मदत, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यासारख्या विभागांमधून हजारो कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी केली आहे. आता ट्रम्प प्रशासनाची लष्करातूनही कपात करण्याची योजना आहे. सध्या अमेरिकन लष्करात ४ लाख ५० हजार सैनिक आहेत. त्यातील ९० हजार सैनिक लवकरच कमी केले जाणार आहेत.