पुणे – कोरोना काळात रेल्वे बोर्डाने डेमू (डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) आणि मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) या रेल्वे गाड्यांना तिकीट दर एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणे आकारले जात होते. या दरांचा फटका प्रवाशांना फटका बसत होता. त्यामुळे डेमू आणि मेमू या गाड्यांच्या तिकीटांचे दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती. याची दखल घेत आता रेल्वे बोर्डाने डेमू व मेमू या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू केले आहे. त्यामुळे ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास आता ‘स्वस्त’ झाला आहे. रेल्वे बोर्डाने डेमू व मेमू या गाड्यांना पूर्वीप्रमाणे पॅसेंजरचे तिकीट दर लागू केले आहे. त्यामुळे ‘डेमू’ अन् ‘मेमू’चा प्रवास आता ‘स्वस्त’ झाला आहे. पुणे विभागात दौंड, कोल्हापूर, सातारा व इतर ठिकाणी डेमू व मेमू रेल्वेच्या प्रवासाचे कमीत कमी तिकीट दर १० रुपये आहे, तर एक्स्प्रेसचे तिकीट दर ३० रुपये आहे. रेल्वे बोर्डाने पूर्वीप्रमाणे निर्णय घेतल्यामुळे डेमू व मेमू गाड्यांचा कमीत कमी तिकीट दर १० रुपये होणार आहे.