डेन्मार्कच्या पंतप्रधानांवर हल्ला! आरोपीला तातडीने अटक

कोपनहेगन- डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला. ही घटना कोपनहेगनमध्ये घडली. अज्ञात व्यक्तीने फ्रेडरिक्सन यांना मागून येऊन जोरात धक्का दिला. यामुळे त्या अडखळल्या. या घटनेनंतर कोपनहेगन पोलिसांनी हल्लेखोराला तातडीने अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, उद्या युरोपियन युनियनच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फ्रेडरिक्सन या सोशल डेमोक्रॅट्सच्या युरोपियन युनियनच्या आघाडीच्या उमेदवार क्रिस्टेल शाल्डेमॉस यांच्यासोबत प्रचार करत होत्या. हा प्रचार आटपून त्या परतत असताना ही घटना घडली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एक व्यक्ती रस्त्याच्या पलीकडून आला. तो पंतप्रधानांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांना जोरदार धक्का दिला. धक्का खूप जोरदार होता. याघटनेनंतर पंतप्रधान काही वेळासाठी एका कॅफेमध्ये जाऊन बसल्या. त्यानंतर त्या सावरल्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top