ठाणे- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. १ डिसेंबर रोजी ठाण्यात ही स्पर्धा होणार आहे.
द्विपात्री स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली असून स्पर्धक जोडीने ५ ते ८ मिनिटाच्या कालावधीचे नाट्य सादर करायचे आहे. स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रती जोडी ३०० रुपये असून विजेत्या स्पर्धकांना प्रथम पुरस्कार १० हजार रुपये, द्वितीय ७ तर तृतीय पुरस्कार ५ हजार रुपये आहे. यावेळी परीक्षकांतर्फे काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत. १ डिसेंबर रोजी ठाण्यातील अ. भा. मराठी नाट्य परिषद, वारकरी भवन, तिसरा मजला, राम मारुती मार्ग, गजानन महाराज मठासमोर, ठाणे (प.) इथे ही स्पर्धा होणार आहे. प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर आहे. ऑनलाईन प्रवेशाकरिता गुगल फॉर्म लिंकसाठी ठाणे शाखेचे प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर यांच्याशी ९८२१०५९४०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.