ठाणे – ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरण योजनेमधील देखभाल दुरुस्ती करणे आणि पिंपळास येथील शुद्ध पाणी वाहून नेणारी १५३० मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर गळती थांबविण्याची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत.घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. या कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |