नवी दिल्ली – नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारल्यानंतर आता ट्रम्प यांच्या कंपनीची भारतातील भागीदार कंपनी ट्रिबेका डेव्हलपर्स भारतात अनेक टोलेजंग इमारती उभारणार आहे.ट्रिबेकाने नुकताच ट्रम्प यांच्या कंपनीशी सामंजस्य करार केला आहे.त्यानुसार प्राथमिक टप्प्यात पुणे, गुरुग्राम, नोईडा, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु येथे सहा गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या सहा प्रकल्पांच्या विक्रीतून ट्रिबेका डेव्हलपर्सला सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे.ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी ही माहिती दिली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |