न्युयोर्क – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी व्यासपीठावर येवून चक्क डान्स केला आणि ट्रम्प यांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले. वोट, वोट वोट, आणि फाईट, फाईट, फाईट म्हणत डान्स केला .अमेरिकेतील पेनिन्स्लेविया भागात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची सभा होती. सभेला प्रचंड गर्दी झाली होती. ट्रम्प यांचे भाषण झाल्यानंतर त्यांनी एलन मस्क यांना व्यासपीठावर बोलावून घेतले आणि भाषण करायला लावले. यावेळी मस्क यांनी सांगितले अमेरिकेतील लोकशाही आणि संविधान वाचण्यासाठी ट्रम्प यांना निवडून देणे आवश्यक आहे. डेमोक्राटीक पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे अमेरिकेचे खूप नुकसान झाले आहे . त्यामुळे आता परिवर्तन घडवण्यासाठी सर्व अमेरिकन नागरिकांनी एकजूट होऊन ट्रम्प यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनवण्याची आवश्यकता आहे असे मस्क यांनी सांगितले.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |