वॉशिंग्टन-अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गैरव्यवस्थापनाचा आरोप करत पनामा कालवा पुन्हा अमेरिकेच्या ताब्यात घेण्याची धमकी दिली. हा कालवा कॅरिबियन देश असलेल्या पनामाचा भाग आहे. या कालव्यावर 1999 पर्यंत अमेरिकेचे नियंत्रण होते.
या कालव्याचा वापर करण्यासाठी पनामा अमेरिकेपेक्षा जास्त शुल्क आकारत असल्याचे ट्रम्प म्हणाले. चीन कालव्यावर आपला प्रभाव वाढवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यात समर्थकांच्या रॅलीला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, ते कालवा चुकीच्या हातात जाऊ देणार नाही.
रॅलीनंतर ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एआयने तयार केला केलेला फोटोही पोस्ट केला. या चित्रात पनामा कालव्याच्या मध्यभागी अमेरिकेचा ध्वज लटकलेला दिसत आहे. फोटोओळीत मध्ये ट्रम्प यांनी ‘वेलकम टू द युनायटेड स्टेट्स कॅनाल’ म्हणजे अमेरिकेच्या कालव्यातआपले स्वागत आहे, असे लिहिले आहे.