न्यूर्यात
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका काहीच महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्षपदाबाबत एक सर्व्हेक्षण समोर आला आहे. त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सर्व 45 राष्ट्राध्यक्षांपैकी सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. या यादीमध्ये ते सर्वात शेवटच्या स्थानावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 14व्या स्थानावर आहेत.
राजकीय अभ्यासक आणि कोस्टल कॅरोलिना युनिव्हर्सिटीचे जस्टिन वॉन आणि ह्यूस्टन युनिव्हर्सिचे ब्रँडन रोटिंगहॉस यांनी हे सर्व्हेक्षण केले आहे. वॉन आणि रोटिंगहॉस यांनी 154 दिग्गजांचे सर्व्हेक्षण केले. ते लोक अमेरिकन पॉलिटिकल सायन्स असोसिएशनशी संबंधित आहेत. या सर्व्हेमध्ये 45 राष्ट्राअध्यक्षांचा समावेश करण्यात आलेला होता. आवडत्या राष्ट्राध्यक्षांमध्ये अब्राहम लिंकन पहिल्या स्थानावर आहेत. गृहयुद्धाच्या काळात त्यांनी सक्षमपणे देशाचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या स्थानावर फ्रँकलिन डेलानो रुझवेल्ट आहेत. त्यांनी मंदीचा काळ आणि दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचे नेतृत्व केले. तर तिसऱ्या स्थानावर जॉर्ज वॉशिंग्टन आहेत.