धाराशिव – सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका ट्रकने शाळकरी मुलाला धडक दिली.या अपघातात अर्णव सोनवणे (१२) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे. मृत अर्णव सोनवणे हा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. सोलापूर हैदराबाद महामार्गाला अंडरपास रस्ता नसल्याने मुलाचा अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रस्ता अडवून आपला संताप व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
