Zoho : झोहो कॉर्पचे संस्थापक श्रीधर वेंबू (Sridhar Vembu) यांनी कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच, त्यांच्या नवीन कामाबद्दल देखील सांगितले. ते आता कंपनीचे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून म्हणून संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे.
श्रीधर वेंबू यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहे AI मधील अलीकडील महत्त्वाच्या घडामोडींसह आमच्यासमोर असलेल्या विविध आव्हानांचा आणि संधींचा विचार करता, माझ्या वैयक्तिक ग्रामीण विकास मिशनला पुढे नेण्यासोबतच R&D उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल, असा निर्णय घेतला आहे.
आता श्रीधर वेंबू यांच्या जागी शैलेश कुमार दवे यांच्याकडे CEO पदाची जबाबदारी असेल. तर टोनी थॉमस अमेरिकेत जोहोचे कामकाज पाहतील. राजेश गमेशन मॅनेजइंजिन आणि मणी वेंबु हे झोहो.कॉम विभागाचे प्रमुख असतील.
कोण आहेत श्रीधर वेंबू?
श्रीधर वेंबू हे झोहोचे संस्थापक आहेत. ही कंपनी क्लाउड-आधारित व्यवसाय सॉफ्टवेअर निर्मितीची काम करते. दोघा भावा-बहिणींची कंपनीत मोठी भागीदारी आहे. त्यांनी प्रिन्सटन येथून इलेक्ट्रिकल इंजिनीरिंगमध्ये पीएचडी केली आहे. फोर्ब्स नुसार, त्यांची एकूण संपत्ती $ 5.8 बिलियन आहे.