झेक रिपब्लिकची क्रिस्टिना यंदाची मिस वर्ल्ड ठरली

मुंबई- मुंबईत काल झालेल्या मिस वर्ल्ड सौंदर्यस्पर्धेत चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिजकोव्हाने विजेतापदाचा मुकूट जिंकला. लेबॅनॉनची यास्मीना फर्स्ट रनर अप ठरली.या स्पर्धेत भारताची सिनी शेट्टी शेवटच्या चार स्पर्धकांत येण्यात अपयशी ठरली. मागील वर्षाची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलावस्का हिने क्रिस्टिना हिला मिस वर्ल्डचा मुकूट घातला.

भारतात मिस वर्ल्डचे आयोजन २८ वर्षांनंतर करण्यात आले. यापूर्वी १९९६ मध्ये भारतात ४६ व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही स्पर्धा मुंबई झाली. यावर्षी या सौंदर्य स्पर्धेत १२० स्पर्धकांनी भाग घेतला होता. प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आणि २०१३ मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी मेगन यंगने यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले. नेहा कक्कर, तिचा भाऊ टोनी कक्कर आणि शान यांसारख्या प्रसिद्ध गायकांनी सादरीकरण केले.

क्रिस्टिना पिस्जकोवा एक विद्यार्थिनी, स्वयंसेवक आणि आंतरराष्ट्रीय मॉडेल आहे. २४ वर्षीय क्रिस्टीना पिस्जकोवा मॉडेलिंग करत असताना कायदा आणि बिझनेस एडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये पदवी शिक्षण घेत आहे. तिने क्रिस्टिना पिस्जकोवा फाउंडेशनची स्थापना केली असून ती अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेत असते. तिला ट्रान्सव्हर्स बासरी आणि व्हायोलिन वाजवण्याचा छंद आहे. तसेच तिला संगीत आणि कलेची आवड असून कला अकादमीमध्ये तिने ९ वर्षे प्रशिक्षण घेतले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top