ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम

पुणे - विठ्ठलाच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल झाल्या.  त्यामुळे पुण्यातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. वारकर्यांच्या टाळ-मृदुंगाच्या गजरात पुणे दुमदुमून गेले होते.  
देहूहून निघालेल्या तुकाराम महाराज यांच्या पालखीने पुण्यातील नाना पेठेतील श्री निवडुंग विठ्ठल मंदिरात मुक्काम केला. उद्याही ही पालखी या मंदिरात थांबणार आहे. २ जुलै रोजी ही पालखी पुण्याहून लोणी काळभोर मार्गे कदम चाक वस्ती येथे मुक्कामाला थांबेल. ३ जुलैला यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा काल पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाडा येथील दर्शन मंडप इमारतीत येथे झाला. त्यानंतर आज सकाळी ही पालखी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. आज व उद्या या पालखीचा मुक्काम पुण्यात असेल. २ जुलै रोजी ही पालखी सासवडकडे रवाना होईल. तेथे 3 जुलैपर्यंत मुक्काम असेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top