जॉर्जिया – जॉर्जियाच्या सापेलो बेटावर एका कार्यक्रमात एका जेट्टीवरुन दुसऱ्या जेट्टीवर जाण्यासाठी उभारण्यात आलेला तात्पुरता पूल कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला. या पुलावर गर्दी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.जॉर्जीयाच्या सापेलो बेटावरील एका कार्यक्रमासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. यावेळी एका जेट्टीवरुन दुसऱ्या जेट्टीवर जाण्यासाठी एक पूल उभारण्यात आला होता. गर्दीमुळे तो पूल कोसळला व त्यावरील २० ते २५ जण थेट समुद्रात पडले. पाण्याखाली असलेल्या दगडांवर आपटल्याने त्यातील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. इतरांचा शोध घेण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते . यातील जखमींना हवाई रुग्णवाहिकेने नेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा पूल नेमका कशामुळे पडला याचा शोध घेतला जात आहे. हॉग हुम्नोक या कृष्णवर्णीय समुदायाचा हा कार्यक्रम दरवर्षी साजरा केला जातो. पूर्वीच्याकाळी गुलाम म्हणून काम केलेल्यांची सुटका केल्यानंतर त्यांचे जॉर्जियातूल या बेटावर पुर्नवसन करण्यात आले होते.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |