Jio Recharge Plan: भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लॅन्स उपलब्ध आहेत. कंपनी ग्राहकांसाठी वेळोवेळी नवीन प्लॅन्स लाँच करत असते. कंपनीने ग्राहकांसाठी 445 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 5G डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह ओटीटी प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. कंपनीच्या या प्लॅन्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
जिओच्या 445 रुपयांचा प्लॅन
जिओने ग्राहकांसाटी 445 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 मोफत एसएमएस आणि दररोज 2GB डेटा दिला जातो. डेली डेटा संपल्यानंतर ग्राहक 64 Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.
या प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV Premium SonyLIV, ZEE5, JioCinema Premium, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, आणि FanCode JioTV आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते.
जिओचा नवीन 448 रुपयांचा प्लान
जिओने ट्रायच्या आदेशानंतर ग्राहकांसाठी 448 रुपयांचा प्लॅन उपलब्ध केला आहे. 84 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 1000 एसएमएस ची सुविधा मिळते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेटा मिळत नाही. याशिवाय, JioTV, JioCinema आणि JioCloud चा अक्सेस मिळतो. जर डेटा हवा असेल, तर यूजर्स स्वतंत्र डेटा पॅक रिचार्ज करू शकतात.