जालंधर- पंजाबच्या जालंधरमध्ये पोलीस आणि लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित दोघांमध्ये चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. बिष्णोई गँगमधील एकाच्या पायाला गोळी लागली. दोघांकडून पोलिसांनी शस्त्रे जप्त केली.
लॉरेन्स बिष्णोई गँग गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेत असताना आज जालंधर येथील बिष्णोई गँगच्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. या अटकेवेळी एकाने पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एकाच्या पायाला गोळी लागली. अटक केलेल्या आरोपींवर खंडणी, हत्या, शस्त्रास्त्र कायदा आणि एनडीपीएस कायद्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी हिसार स्पेशल टास्क फोर्सने काल लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी संपत नेहरा याला अटक केली होती.