नाशिक- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला उमेदवार उभे करावेत असे आव्हान अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढविण्याच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले. भुजबळ म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही आहे. मनोज जरांगे जी भूमिका घेतील ती घेतील, मला तर असे वाटते की त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजेत. लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे. राज्यात असे कितीतरी पक्ष निर्माण झालेले आहेत. त्यांनी सुद्धा नशीब आजमावायला हरकत नाही.
समीर भुजबळ शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांवर छगन भुजबळ म्हणाले की, समीर भुजबळ हे माझ्याबरोबर आहेत, अजित पवारांबरोबरच आहेत. येवला मतदारसंघात काम करणार आहेत