जरांगेंच्या स्वागतासाठी थांबलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू

नाशिक : मराठा आंदोनकर्ते मनोज जरांगे हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी नांदगावात थांबलेल्या व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. दादासाहेब पुंडलिक काळे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनोज जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होण्याआधीची ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मनोज जरांगे यांनी दवाखान्यात जावून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे विचारपूस करत त्यांना धीर दिला.
मनोज जरांगे हे नांदगावमध्ये दाखल होणार असल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जय्यत तय्यारी करण्यात आलेली होती. यावेळी डिजेच्या तालावर या दादासाहेब काळे यांनी नृत्य देखील केले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास काळे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते कोसळले त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. नांदगाव दौऱ्यावर आलेले मनोज जरांगे यांनी कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात जावून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेत चौकशी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top