जयसिंगपुरात १० रोजी स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा

जयसिंगपूर – श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त शहरातील गल्ली नंबर ६ मधील श्री स्वामी समर्थ मंदिरात बुधवार १० एप्रिल रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

यानिमित्ताने बुधवारी पहाटे ५ वाजता अभिषेक तर सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत स्वामी याग आणि अकरा ते अडीच यावेळेत महाप्रसादाचे वाटप होणार आहे.त्याचप्रमाणे दुपारी मंदिरापासून स्वामीच्या नगरप्रदक्षिणा आणि सायंकाळी येथील ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात स्विदेश्वर महाराज व स्वामी महाराज यांची हरीहर भेट होणार आहे.त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक काढली जाईल. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top