श्रीनगर- जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यातील प्रचार काल संध्याकाळी संपला. या टप्प्यासाठी जम्मू, उधमपूर, सांबा आणि जम्मू विभागातील कठुआ आणि उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या सात जिल्ह्यांमधील ४० जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या भागातआचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी राज्यात आतापर्यंत २३ सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे, तर ६ कंत्राटी व तदर्थ कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान १८ सप्टेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान २५ सप्टेंबर रोजी पार पडले. तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहे.
