श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे काल सुरक्षा दले आणि दहसतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलास यश आले. सुरक्षा दलांनी आज सकाळी कुपवाडा जिल्ह्यातील क्रुमभूरा भागात शोध मोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर जवानांनी परिसराला वेढा दिला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, इथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी क्रुमहुरा गावाला घेराव शोध मोहीम सुरू केली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलांच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.या परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याचे सांगितले जात होते. त्यातील एकाला सुरक्षा रक्षकांनी टिपले. या परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. सुरक्षा दलांनी नागरिकांना घरातच राहण्याचा आणि चकमकीच्या ठिकाणी फिरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
