जम्मू-काश्मीरमध्ये गारठले बर्फवृष्टीने जनजीवन बाधित

श्रीनगर
जम्मू काश्मिरसह उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सध्या तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले असून जम्मू काश्मीरमध्ये अनेक भागामध्ये दोन दिवसांपासून बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे जनजीवन बाधित झाले आहे.
बारामुल्ला, कुपवारा, पुंछ, मुज्जफराबाद, किश्तवार, उधमपूर आणि पुलवामासह अनेक भागात हलकी ते मध्यम स्वरूपाची बर्फवृष्टी सुरु आहे. ही बर्फवृष्टी पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय हवामान विभागाने वर्तवला आहे. येथील डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरु असून मैदानी भागात पाऊस सुरू आहे. या भागातील तापमानातही मोठ्या प्रमाणात घट झाली असून थंडीची हा लाट पुढील काही दिवस सुरु राहणार असल्याचेही हवामान विभागाने कळवले आहे. अनंतनाग जिल्ह्यात बेरीनाग या ठिकाणी जोरदार वादळामुळे काही इमारती पडल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यातील जिवितहानीचे वृत्त नाही. आज सकाळीही या भागात नव्याने बर्फवृष्टी झाली. गुलमर्ग आणि सोनमर्ग त्याचप्रमाणे दूधपथरी या भागात जोरदार बर्फवृष्टी झाली असून गुरेज, कुपवाडा, बालटाल सारख्या भागात बर्फवृष्टी झाली. येत्या दोन दिवसांत बर्फवृष्टी सुरु राहणार असून त्यानंतर हवामानात अनुकुल बदल होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top