POCO ने भारतासह जगभरात नवीन स्मार्टफोन सीरिज Poco X7 ला लाँच केले आहे. यामध्ये कंपनीने Poco X7 आणि POCO X7 Pro ला लाँच केले आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50 मेगापिक्सल मुख्य रियर कॅमेरा आणि 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, MediaTek Dimensity 7300-Ultra प्रोसेसर देण्यात आला. या दोन्ही फोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G ची किंमत
Poco X7 5G ला कंपनीने दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केले आहे. याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 21,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे. फोन ग्लेशियर ग्रीन, कॉस्मिक सिल्वर आणि पोको येलो रंगात उपलब्ध होईल. Poco X7 Pro 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये, आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये आहे. प्रो मॉडेल नेब्यूला ग्रीन, पोको येलो आणि ऑसिडियन ब्लॅक रंगात येते. ग्राहक Poco X7 5G आणि X7 Pro 5G ला अनुक्रमे 14 आणि 17 फेब्रुवारीपासून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात.
Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Poco X7 5G मध्ये Android 14 आधारित HyperOS आउट-ऑफ-द-बॉक्स दिले आहे. यात 6.67 इंच 1.51.5K कर्व्ड AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट 120Hz, 240Hz टच सँपलिंग रेट आहे. सोबतच, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन देखील मिळते. Poco X7 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह 6.73-इंच 1.5K फ्लॅट AMOLED डिस्प्ले मिळतो.
Poco X7 5G फोन MediaTek Dimensity 7300-Ultra चिपसेटवर काम करतो, तर Pro व्हेरिएंटमध्ये MediaTek Dimensity 8400-Ultra SoC दिले आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट शूटर कॅमेरा दिला आहे. Poco X7 5G मध्ये OIS आणि EIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस मिळेल. प्रो व्हेरिएंटमध्ये देखील अल्ट्रावाइड लेंससह 50-मेगापिक्सल Sony LYT-600 मुख्य लेंस दिली आहे.
Poco X7 Pro 5G मध्ये 90W हाइपरचार्ज सपोर्टसह 6,550mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर Poco X7 5G मध्ये 45W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरी मिळते.