ब्रिटन- जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जॉन अल्फ्रेड टिनिसवूड यांचे सोमवारी वयाच्या ११२ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या कुटुंबीयांनी काल ही माहिती दिली.टिनिसवूड हे ब्रिटनमधील साउथपोर्ट केअर होम या वृद्धाश्रमात राहात होते.
टिनिसवूड यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१२ रोजी झाला.ते २०२० मध्ये यूकेमधील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले. एप्रिल २०२४ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून मान्यता दिली. एप्रिल २०२४ मध्ये वयाच्या १११ व्या वर्षी व्हेनेझुएलाचे ११४ वर्षीय जुआन व्हिसेंट पेरेझ यांचे निधन झाल्यानंतर ते जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनले.दुसऱ्या महायुद्धात रॉयल आर्मी पेस कॉर्प्समध्ये त्यांनी चांगली सेवा बजावली.त्यांनी तेथे अकाउंट्स आणि ऑडिटिंग आणि अडकलेले सैनिक शोधून काढण्यासह खाण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचेही नियोजन करण्याचे काम केले होते.