छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधी क्रांती चौकात आज ईव्हीएमविरोधात आंबेडकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी करत ईव्हीएमनचे प्रतिकात्मक दहन केले. यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीही आधी ईव्हीएमचा विरोध करून व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करायचे. परंतु आता त्यांचे सरकार आल्यावर ते ईव्हीएमचे समर्थन करतात. कारण त्यांना माहीत आहे की, ईव्हीएममध्ये हेरफेर करून या निवडणुका जिंकू शकतात. या देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल ईव्हीएमवरील निवडणुका रद्द व्हायला पाहिजेत.