छत्तीसगडमधील 2 उद्योगपती, बिल्डरांच्या ठिकाणांवर छापे

रायपूर- छत्तीसगडमधील दोन मोठे उद्योगपती आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांच्या अनेक ठिकाणांवर आज एकाच वेळी आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामुळे छत्तीसगडमधील उद्योगपतींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. छत्तीसगडमधील कवर्धा, जशपूर, बिलासपूर, रायपूर, सुरगुजा, सीतापूर आणि रायगड जिल्ह्यांत 25 हून अधिक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली.
आज सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या कारवाईत आयकर विभागाच्या 50 पथकांचा सहभाग होता. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत 2.50 कोटी रुपयांची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले. त्यासोबत अनेक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले आहेत. ज्याद्वारे 13 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कारभार झाल्याचे उघड होत आहेत. हा बेकायदेशीरपणे कमावलेला पैसा सहकाऱ्यांमार्फत रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचेही पुरावे मिळाले आहेत. जवळच्या सहकाऱ्यांकडून बेकायदेशीरपणे जमीन खरेदी करण्यासंबंधीची कागदपत्रेही सापडली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top