नवी दिल्ली – राजधानी दिल्लीची लाईफलाईन मानल्या गेलेल्या दिल्ली मेट्रोच्या उन्नत मार्गावर सिग्नल चोरीला जाण्याच्या वाढल्या आहेत. काल तर चोरट्यांनी चक्क सिग्नलची केबलच चोरून नेल्याने आज दिवसभर मेट्रो सेवेची गती मंदावली.
दिल्ली ब्लू लाईन मेट्रोच्या मोती नगर ते किर्तीनगर या मार्गावरील सिग्नल केबल चोरट्यांनी चोरून नेत्याचे आज सकाळी मेट्रो सेवा सुरू होताच आढळले. त्यामुळे मेट्रोमार्गावर गाड्यांचे संचालन करणे कठीण झाले. परिणामी मेट्रोच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या. तर ज्या फेऱ्या चालविल्या जात होत्या त्यांचा वेग संथ होता. त्यामुळे दररोज मेट्रोने ये-जा करणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा फटका बसला.