चेन्नई – चेन्नईच्या अन्ना विद्यापिठाच्या आवारात एका गंड प्रवत्तीच्या बदनामी करण्याचा भीती दाखवून एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. ही विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत आडोशाला बसली होती.त्याचवेळी तिथे आलेल्या इसमाने त्यांचे मोबाईलवर चित्रण केले आणि त्याआधारे बदनामी करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
ज्ञानशेखरन असे संशयित इसमाचे नाव आहे. त्याचा विद्यापिठालगत खाण्यापिण्याच्या पदार्थांचा व्यवसाय आहे. पोलिसांनी संशयावरून त्याला अटक केली आहे.
बलात्काराची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. मात्र पीडित तरुणीने काल पोलीस हेल्पलाईनवर याबाबतची तक्रार केली. विद्यापीठ प्रशासनाने आणि पोलिसांनीही घटना गांभीर्याने घेतली असून सुरक्षा व्यवस्थेची झाडाझडती घेण्यात येणार आहे.