बिजिंग – चीनमधील कायद्यांनुसार क्रिप्टो करन्सी देशात कायदेशीर असल्याचा निर्वाळा शांघाय न्यायालयाने दिला आहे. चीनमध्ये बिटकॉइनचा भाव चांगलाच वधारला आहे. क्रिप्टोकरन्सी ही एक प्रकरची मालमत्ता असते.त्यामुळे या आभासी चलनाचा व्यवहार कायदेशीर आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शांघाय सॉन्गजियांग पीपल्स कोर्टाचे न्यायाधीश सन जी यांनी या आठवड्यात शांघाय हाय पीपल्स कोर्टाच्या अधिकृत वुई चॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, चिनी व्यावसायिक संस्थांना क्रिप्टो करन्सी वापरण्यास परवानगी नसली तरी एखाद्या व्यक्तीने क्रिप्टोकरन्सी बाळगणे बेकायदेशीर नाही. त्यामुळे ‘इच्छेनुसार’ क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक किंवा टोकन जारी करणे बेकायदा नाही. चीनमध्ये बेकायदेशीर मानल्या गेलेल्या बिटकॉईन व्यवहाराबाबत दोन कंपन्यांमधीलवादांवर सुरु असलेल्या खटल्यात याचा उहापोह करण्यात आला आहे.