बीजिंग -पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने गोळा करण्यासाठी चीनने पाठविलेले ‘चँग ई-६’ हे चांद्रयान काल पृथ्वीवर सुखरूप परतले.चंद्रावरून माती आणण्यात चीनच्या चांद्रमोहिमेला यश आले आहे.या कामगिरीमुळे चंद्राच्या न दिसणाऱ्या भागातील मातीचे नमुने पृथ्वीवर आणणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.
चँग ई-६ यान दक्षिण चीनमधील हैनान प्रांतातून ३ मे रोजी प्रक्षेपित झाले होते.पृथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरले होते. सुमारे ५३ दिवसांनंतर यान काल दुपारी उत्तर मंगोलियातील वाळवंटात उतरले. यानाने चंद्रावरून विशेषतः दक्षिण ध्रुवावरील एटकेन खोऱ्यातील अपोलो विवरातून दोन किलो माती पृथ्वीवर आणली आहे.
चंद्राचा भूवैज्ञानिक इतिहास आणि पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणाऱ्या आणि दिसणाऱ्या बाजूंमधील तफावतींवर यामुळे प्रकाश टाकला जाईल,अशी अपेक्षा आहे.यानातून रोव्हर बाहेर आल्यानंतर दोन दिवस दगड-माती गोळा केली.ड्रिल यंत्र आणि रोबोटिक हातही यानातून पृथ्वीवर परत आणले.