चांद्रयान-3 यानाला मिळणार जागतिक अंतराळ पुरस्कार

बंगळुरू- इटलीतील मिलान येथे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ७५ व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेच्या उद्घाटन समारंभात चांद्रयान-3 ला जागतिक अंतराळ पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय संशोधन संस्था इस्रोने अंतराळ क्षेत्रात भरीव कामगिरी केली. चांद्रयान-३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला. या मोहिमेमुळे देशाची मान जगात उंचावली, इस्रोच्या या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली व आता चांद्रयान-3 ला इंटरनॅशनल स्पेस फेडरेशन जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित करणार आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले होते. तब्बल वर्षभरानंतर इस्रोच्या या कामगिरीचे जागतिक स्थरावर कौतुक केले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top